अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:43 IST2017-07-23T00:38:47+5:302017-07-23T00:43:54+5:30
नांदेड: औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली़

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली़
दहावीतील बंजारा समाजाच्या मुलीवर १५ जुलै रोजी अत्याचार करून तिची अमानुष हत्या केली होती़ पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत जंगलात फेकण्यात आले़ या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांना लावता आला नाही़ राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ नांदेड शहरातील सांगवी येथेही एका बंजारा समाजाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता़ हे प्रकरणही अद्याप चौकशीवरच आहे़ या प्रकरणाचा शोध लावून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड, माजी जि़ प़ सदस्य रोहिदास जाधव, शोभाराणी राठोड, प्रा़ गणेश जाधव, अरविंद राठोड, पी़ बिंदू नाईक आदींनी केली आहे़