शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:39 IST

छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून मे महिन्यात दिल्लीला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. कारण मे महिन्यातील दिल्ली विमानाचे प्रवास भाडे गगनाला भिडले आहे. त्यामुळे विमान प्रवासी आणि टूर व्यावसायिकांकडून ओरड होत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते. तर इंडिगोचे विमान सायंकाळी ६:५५ वाजता उड्डाण घेते. मे महिन्यात दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे. शालेय सुट्यांमुळे मे महिन्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा गैरफायदा घेत विमान कंपन्यांनी भाडेवाढीचा दणका दिल्याची ओरड होत आहे.

१० हजार रुपयेमे महिन्यात दिल्ली गाठायची तर एअर इंडियासाठी १० हजार व इंडिगोसाठी ७ हजार ५०० रुपये कमीत कमी मोजावे लागत आहेत. तारखेनुसार यात वेगवेगळे दर आहेत. तसेच हैदराबाद, मुंबई, बंगळुरू विमान प्रवास तिकीट दरांची मनमानी सुरू आहे. संध्याकाळी मुंबईहून येणारे व जाणारे विमान दररोज उशिरा उड्डाण घेते. त्यामुळे अनेकांचे आंतरराष्ट्रीय विमान चुकत आहे, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.

या समस्येची दखल घेणारे नेते नाहीतप्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दोन्ही विमान कंपन्यांनी स्वस्त फेअरचे बुकिंग क्लास बंद करून महाग फेअर क्लास सुरू केला. अवाजवी नफेखोरी सुरू केली. दिल्लीसाठी फक्त दोन विमाने आहेत. यावर बोलणारे कोणी नेते नाहीत. कंपन्यांवर अंकुश नसल्याने त्यांचे फावते. असोसिएशनमार्फत इंडिगो विमान कंपनीला मुंबईच्या विमानाची वेळ थोडी लवकर करावी आणि दिल्लीसाठी सकाळचे अजून एक विमान सुरू करा, अहमदाबादला एक विमान द्यावे, आदी मागण्या केल्या आहेत.- मंगेश कपोते, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

टॅग्स :airplaneविमानchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन