निधी मागणीसाठी शिष्टमंडळ रवाना
By Admin | Updated: June 26, 2017 23:39 IST2017-06-26T23:35:53+5:302017-06-26T23:39:33+5:30
हिंगोली : पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीच भूमिका घेत नसल्याने खासदार-आमदारांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे.

निधी मागणीसाठी शिष्टमंडळ रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीच भूमिका घेत नसल्याने खासदार-आमदारांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे. हे शिष्टमंडळ काय भूमिका घेते, हे मुंबईत गेल्यावरच कळणार आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या प्रस्तावांसाठी पालकमंत्री कधीच फारसे आग्रही राहिले नाहीत, असा विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही आरोप आहे. त्यातूनच खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते, आ.जयप्रकाश मुंदडा यांचे शिष्टमंडळ रवाना झाले आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांचाही त्याला बाहेरून पाठिंबा आहे. नर्सी, औंढा तीर्थक्षेत्राच्या आराखड्यासह अनेक बाबींचे प्रस्ताव शासन दरबारी पडून आहेत. वार्षिक योजनेतही फारसा निधी वाढत नाही. नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी आखडता हात घेतला जात असल्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली जाणार आहे.