शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पार्सल देण्यास उशीर, डिलीव्हरी बॉयला पोलिसाची लाठीने अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 20:30 IST

गुन्हा दाखल होताच उपायुक्त नवनीत काँवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसावर निलंबनाची कारवाई केली

छत्रपती संभाजीनगर : पार्सल देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून सिडको पोलिस ठाण्याच्या मुजोर पोलिसाने डिलीव्हरी बॉयला लाठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. सोमवारी आविष्कार कॉलनीत ही घटना घडली. जीवन शेजवळ असे पोलिसाचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जितेंद्र मानके (३०) यांची २००७ पासून वृत्तपत्राची एजन्सी आहे. कुटुंबाला आर्थिक हातभारासाठी सहा महिन्यांपासून त्यांनी ऑनलाइन पोर्टलच्या डिलीव्हरीचेही काम सुरू केले होते. सोमवारी पहाटे ४ ते ७ दरम्यान वृत्तपत्र वाटपानंतर सकाळी ११ वाजता ऑनलाइन पार्सलचे काम सुरू केले. त्यापैकी एक पार्सल शेजवळचे होते. १०:३० वाजता त्याने जितेंद्र यांना कॉल करून पार्सल लवकर देण्यास सांगितले. मात्र, पाऊस थांबताच पार्सल देतो, असे आश्वासन जितेंद्र यांनी दिले.

संपूर्ण अंगावर उमटले वळडिलीव्हरी करण्यासाठी एकूण ८५ पार्सल असल्याने जितेंद्र यांना वेळ लागत होता. त्या दरम्यान, शेजवळने चार कॉल केले. दुपारी २:३० वाजता आविष्कार कॉलनीत त्यांना संपर्क केला, तेव्हा शेजवळ थेट फायबरची काठी घेऊन पोहोचला. शिवीगाळ करून इतक्या उशिरा पार्सल आणतो का, असे म्हणत मारहाण सुरू केली. जीवनच्या शरीरावर त्याने सटासट लाठ्या बरसल्या. ओठ फुटून त्यांच्या संपूर्ण अंगावर रक्ताचे वळ उमटले. स्थानिकांनी धाव घेत जितेंद्र यांची सुटका केली.

‘नव्या’ पोलिसांचा उच्छांदगेल्या काही वर्षात नव्याने दाखल झालेले तरुण पोलिस शहरात अनेक ठिकाणी दादागिरी, गुंडगिरीची भाषा वापरतात. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. गस्तीवर दबंगगिरी करणे, टपऱ्या, हॉटेल चालकांकडून बळजबरीने पाण्याच्या बाटल्या, पुड्या, खाण्याचे पार्सल घेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. वाइनशॉपच्या बाहेर उभे राहून अनेक वेळा ग्राहकांना धमकावून पैसे उकळले जातात. त्यास नकार दिला की, वरिष्ठांच्या नावाने धमकावले जाते.

तत्काळ निलंबनाचे आदेशउपायुक्त नवनीत काँवत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. गुन्हा दाखल होताच, शेजवळला निलंबित केले. त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई होईल, असेही काँवत यांनी स्पष्ट केले.आरोपी, जखमांचे छायाचित्र

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी