सारा व्यंकटेश सोसायटीत निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST2021-05-09T04:05:47+5:302021-05-09T04:05:47+5:30

वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर परिसरातील सारा व्यंकटेश सोसायटीत गत ६ दिवसांपासून निर्जळी असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत ...

Dehydrated in Sarah Venkatesh Society | सारा व्यंकटेश सोसायटीत निर्जळी

सारा व्यंकटेश सोसायटीत निर्जळी

वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर परिसरातील सारा व्यंकटेश सोसायटीत गत ६ दिवसांपासून निर्जळी असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिडको प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन पाळले जात नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. नळाला पाणी न आल्याने नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.

------------------------

उद्योगनगरीत ७ हजारांचा गुटका पकडला

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील जोगेश्वरी रोडवर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी एका टपरीवर छापा मारून ७ हजारांचा गुटका पकडला आहे. आरोग्यास अपायकारक असणाऱ्या गुटक्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. मात्र जोगेश्वरीरोडवर गणेश साहेबराव लुटे (रा.रांजणगाव) हा चोरी-छुपे त्यांच्या पानटपरीवर गुटका विक्री करीत होता. ६ मे रोजी पोलिसांनी यांनी छापा मारून गणेश लुटे याच्या पानटपरीतील ७ हजार ३००रुपयाचा गुटका जप्त केला आहे.

----------------------

जोगेश्वरीत संचारबंदीला खो

वाळूज महानगर : कोविडमुळे जिल्हाभरात संचारबंदी करण्यात आली असली तरी जोगेश्वरीत संचारबंदीच्या आदेशाला खो दिला जात आहे. गावातील नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरतात. मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद आहेत, मात्र अंतर्गत वसाहतीतील सर्वच दुकाने सुरू असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी ऊसळते आहे. अनेकजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता संचारबंदीलाही खो देत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

--------------------------------------

कामगार नाक्यावर मजुराची गर्दी

वाळूज महानगर : रांजणगाव फाट्यावरील कामगार नाक्यावर कामासाठी मजुराची मोठी गर्दी उसळत आहेत. गत महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहेत. छोटे-छोटे उद्योग बंद पडले असून दुकानेही बंद असल्याने मजुराचे हाल होत आहे. रांजणगावच्या कामगार नाक्यावर बिगारी, बांधकाम मिस्तरी, मजूर, हमाल आदी कामासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसते आहे.

------------------------------------

वाल्मीरोडवर पाण्याची नासाडी

वाळूज महानगर : वाल्मीरोडवरील एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. बजाजगेट ते वाल्मी या रस्त्यावरील जलवाहिनीला गळती लागलेली असून व्हॉल्व्हमधून पाणी वाहून जात आहे. सध्या कडक ऊन पडत असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र एमआयडीसी प्रशासनाकडून पाण्याच्या नासाडी सुरू आहे.

-----------------------------------

Web Title: Dehydrated in Sarah Venkatesh Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.