‘वैद्यकीय’च्या १२७ जागांचे प्रवेश निश्चित

By Admin | Updated: July 16, 2014 01:29 IST2014-07-16T01:06:18+5:302014-07-16T01:29:00+5:30

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्याच प्रवेश फेरीत औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १५० पैकी १२७ जागांचे प्रवेश निश्चित झाले.

Definition of 'medical' 127 seats | ‘वैद्यकीय’च्या १२७ जागांचे प्रवेश निश्चित

‘वैद्यकीय’च्या १२७ जागांचे प्रवेश निश्चित

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्याच प्रवेश फेरीत औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १५० पैकी १२७ जागांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित २३ जागांवर १८ जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या फेरीत अखिल भारतीय स्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया १७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यानुसार वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल वेळेतच लावण्यात आला. त्यानंतर २५ जून रोजी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. दुसरी फेरी १८ जुलै रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२७ विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार प्रवेश जाहीर झाले. विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात आपले प्रवेश निश्चित केले.
दुसऱ्या फेरीत उरलेल्या २३ जागांवरही प्रवेश होतील. या महाविद्यालयात आजपर्यंत प्रवेशाची एकही जागा रिक्त राहिलेली नाही. यंदाही सर्व जागांवर प्रवेश होतील, असा दावा सीईटी विभागाचे डॉ. बेग यांनी सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रम संचालनालयाने प्रवेशासाठी राज्याचे ४ विभाग केले आहेत. या विभागांसाठी प्रत्येकी एक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूर या विभागीय शहरांचा समावेश आहे. या केंद्रावर अखिल भारतीय स्तरावरील प्रवेशाची दुसरी फेरी होईल.
केंद्रांतर्गत जिल्हे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश फेरीसाठी केंद्र दिले असून या केंद्रात औरंगाबाद, नांदेड, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, जळगाव आणि बुलडाणा या जिल्ह्यांतील उमेदवारांची प्रवेश प्रक्रि या राबविण्यात आली.

Web Title: Definition of 'medical' 127 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.