शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पन्नाशी ओलांडली मग एक काम नक्की करा, दरवर्षी डोळे तपासूनच घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:15 IST

मधुमेही रुग्णांनी सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

औरंगाबाद : चाळीस वर्षांवरील व्यक्तींमध्ये दृष्टी कमी होण्याच्या कारणांपैकी मोतीबिंदू हे अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. डोळ्यांच्या आतमधील भिंग हे कॅमेऱ्याच्या भिंगाप्रमाणे काम करते. स्पष्ट दृष्टिकरिता दृष्टिपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण करते. आपल्याला लांबच्या व जवळच्या सर्व वस्तू स्पष्टपणे दिसण्याकरिता डोळ्यांचा केंद्रबिंदू अनुकूल बनविण्याचे काम भिंग करते. परंतु, जसजसे वय वाढत जाते, तसतशी शरीरातील काही प्रथिनांची एकत्रित गुठळी बनते. नेत्रभिंगावर आच्छादन वाढवते व त्यामुळे दिसण्यात अडचणी येतात. त्यामुळे पन्नाशीनंतर प्रत्येक वर्षी डोळ्यांची तपासणी करायला हवी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मोतीबिंदूची लक्षणेमोतीबिंदू हा हळुहळू सुरू झाल्यावर दृष्टीवर परिणाम होतो. दृष्टी धूसर होते.सूर्यपक्राश, दिव्याचा प्रकाश खूप प्रखर व चमकदार दिसू शकतो. रंगही पूर्वीएवढे उठावदार दिसत नाहीत.न्युक्लिअर मोतीबिंदूत पुनर्दृष्टीचा अनुभव येतो. मात्र, ती अल्पकाळासाठी राहते.

मोतीबिंदूची कारणेसूर्यप्रकाश, अतिनिल किरणांचे प्रमाण, मधुमेह, अतितणाव, रक्तदाब, स्थुलता, धूम्रपान, कॉर्टिकोस्टीरॉईड औषधांचा दीर्घकालीन उपयोग, कोलेस्ट्राॅल कमी करण्यासाठीच्या औषधांचा वापर, पूर्वी डोळ्यांना झालेली जखम, हार्मोन उपचार पद्धती, लघुदृष्टी दोष, अनुवंशिकता, व्हिटॅमिनची कमतरता मोतीबिंदूला कारणीभूत ठरतात.

काळजी काय घेणारव्हिटॅमिन ई, कॅरोटीनॉईड, ल्युटीन आदी अन्नद्रव्यांचे सेवन जोखीम कमी करते. फळे व सूर्यफुल बिया, बदाम, पालक, मेथी, केळी, हिरव्या पालेभाज्या मोतीबिंदू टाळण्यासाठी मदत करतात. तर मधुमेही रुग्णांनी सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

शासकीय रुग्णालयात फुकटात होते शस्त्रक्रियाग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रात ठरवून दिलेले नेत्रतज्ज्ञ तपासणीसाठी येतात. नियमित शिबिरांचे आयोजन होते. त्यात आवश्यकतेनुसार शासकीय रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नियोजित केले जाते. घाटी रुग्णालयात नेत्र विभागात गुंतागुंतीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होतात.

शस्त्रक्रिया मोफत होतेराष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ तपासणी व उपचार मोफत करतात. जिल्हा रुग्णालयाच्या आमखास मैदान येथील नेत्र रुग्णालयात नेत्ररोगतज्ज्ञ नियोजित शस्त्रक्रिया मोफत करतात.- डाॅ. महेश वैष्णव, नोडल ऑफिसर, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर