रांजणगाव रस्त्यावर सदोष गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:31+5:302021-01-08T04:11:31+5:30

------------------------- पंढरपुरात अवैध दारु विक्री करणाऱ्यास पकडले वाळूज महानगर : पंढरपुरातील फुलेनगरात अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी ...

Defective speed bumps on Ranjangaon road | रांजणगाव रस्त्यावर सदोष गतिरोधक

रांजणगाव रस्त्यावर सदोष गतिरोधक

-------------------------

पंढरपुरात अवैध दारु विक्री करणाऱ्यास पकडले

वाळूज महानगर : पंढरपुरातील फुलेनगरात अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पकडले. आरोपी भीमा दामू काळे (रा. फुलेनगर) याच्या ताब्यातून दारुच्या २१ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

फुलेनगरात अवैधरित्या देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने छापा मारुन भीमा काळे यास ताब्यात घेतले. आरोपीने लपवून ठेवलेल्या १ हजार २९ रुपये किमतीच्या २१ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

-----------------------

कामगार चौकात सांडपाणी रस्त्यावर

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील कामगार चौकात सांडपाणी उघड्यावरुन वाहत असल्याने ये-जा करणाऱ्या कामगार व वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या चौकातील विविध व्यावसायिकांनी सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या अतिक्रमण करुन बुजविल्या आहेत. परिणामी या सेक्टरमधील कंपन्यांचे पाणी या चौकातून वाहते . एखादे वाहन रस्त्यावरुन गेल्यावर घाण पाणी अंगावर उडत असल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

--------------------------

भविष्यदीपनगरात साफसफाईकडे दुर्लक्ष

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी परिसरातील भविष्यदीपनगरात साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या वसाहतीत ठिकठिकाणी कचरा साचला असून अस्वच्छता पसरली आहे. ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी या परिसरात फिरकत नसल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.

------------------------------

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

वाळूज महानगर : वाळूज परिसरात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील वळदगाव, पाटोदा, गोलवाडी, नायगाव, गंगापूरनेहरी, वाळूज आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याने गव्हावर मावा पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

------------------------

गोलवाडी थांब्यावर बस थांबेना

वाळूज महानगर : गोलवाडी बस थांब्यावर शहर बस थांबत नसल्यामुळे गावातील प्रवाशांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. या थांब्यावर बस उभी करण्याचे सौजन्य बसचे चालक व वाहक दाखवित नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव काळी-पिवळी व अ‍ॅपेरिक्षातून प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे बसमध्ये पुरेसे प्रवासी नसतांनाही बस थांबविली जात नसल्यामुळे प्रवाशांत नाराजीचा सूर उमटत आहे.

--------------------------------

Web Title: Defective speed bumps on Ranjangaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.