सीईओ म्हणून दीपक चौधरी रुजू
By Admin | Updated: May 12, 2015 00:49 IST2015-05-12T00:12:57+5:302015-05-12T00:49:20+5:30
जालना: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीपक चौधरी हे सोमवारी सकाळी रुजू झाले.

सीईओ म्हणून दीपक चौधरी रुजू
जालना: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीपक चौधरी हे सोमवारी सकाळी रुजू झाले.
चौधरी यांनी यापूर्वी नाशिक येथे उपायुक्त, अकोला येथे महापालिका उपायुक्त, जळगाव येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तर औरंगाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी ठिकठिकाणच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करुन अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. जालना जिल्हा परिषदेच्या कारभार ते आता कितपत रुळावर आणतात, याची चर्चा सुरु झाली आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.यावेळी डॉ. अशोक कोल्हे, मुकिम देशमुख, पी.टी.केंद्रे, चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)