शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात दूध उत्पादनात घट

By admin | Updated: August 7, 2014 02:06 IST

दूध उत्पादनासाठी काही वर्षापूर्वी भूम तालुका अग्रेसर होता.

दूध उत्पादनासाठी काही वर्षापूर्वी भूम तालुका अग्रेसर होता. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाला गती मिळाली होती. मात्र सततचा दुष्काळ, चाऱ्याचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, दूध उत्पादनातही कमालीची घट झाली आहे. दोन महिन्यापूर्वी २ लाख ३० हजार ते २ लाख ५० हजार लिटर एवढे भूम तालुक्यात दूध संकलन होत होते. ते आता १ लाख ८० हजार लिटरवर आले आहे.भूम तालुक्यात तसे बागायत क्षेत्र कमी होते. याबरोबरच हा डोेंगराळ भाग असल्याने फळबागांची संख्याही अत्यल्प होती. अशा स्थितीत जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या संख्येने वळले. त्यामुळे अवघ्या काही वर्षातच भूम तालुक्याची दुग्ध उत्पादनातील अग्रेसर तालुका म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण झाली. भूमसह परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्र उभारली. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खुळखुळू लागला. वाढत्या दूध संकलनाबरोबरच दुधावर प्रक्रिया उद्योग उभारण्याकडेही शेतकरी आकृष्ट झाला. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातच मोठ्या प्रमाणात खवा भट्या उभारल्या. याद्वारे नाशिक, पुण्यासह हैदराबादसारख्या मोठ्या शहरात भूम तालुक्यातील खवा जावू लागला. खवा भट्यांमुळे अनेक बेरोजगारांच्या हातालाही काम मिळाले. हा व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी शासनानेही विविध योजना सुरु केल्या असल्या तरी त्याचा थेट लाभ दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच मागील तीन वर्ष पावसाने भूम तालुक्याकडे पाठ फिरविली आहे. पावसाअभावी चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला असून, जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत चाऱ्याचे भाव अडीच ते तीन हजारावर पोहंचले आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात चारा नाही. आणि परजिल्ह्यातून चारा आणण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी दुभती जनावरे मिळेल त्या किंमतीत बाजारात विकू लागल्याचे चित्र आहे. शासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.