शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

अवकाळीचा फटका, १० दिवसांत एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत जाहीर करू: अब्दुल सत्तार

By बापू सोळुंके | Updated: April 13, 2023 19:28 IST

राज्यात ४३ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे

छत्रपती संभाजीनगर: अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीठमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टश्रवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हिमायतबाग येथील कृषी विद्यापीठाच्या विज्ञानभवन येथे त्यांनी मतदार संघातील कामांसंदर्भात कृषीमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, अतिवृष्टी, संततधार, परतीचा पाऊस आणि आता अवकाळी, गारपीठ अशा प्रकारे सहा महिन्यात चाैथ्यांना शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी आणि गारपीठमुळे राज्यात सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकाचे तर मराठवाड्यातील ११ हजार १६६हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर जिल््यात ५हजार ९५६ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला नाही, त्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले आहेत. आतापर्यंत ७०टक्के पंचनामे झाले आहेत. २४ तासांत उर्वरित पंचनामे पूर्ण होतील आणि पुढील १० दिवसांत बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय राज्यसरकार घेईल, असे त्यांनी नमूद केले.

एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत दे्ऊगतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. तशीच मदत गारपीठमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन देईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. प्राप्त होणारी पंचनामे वस्तूनिष्ठ आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी कृषी आयुक्त आणि महसूल आयुक्त संयुक्तपणे २४ तासांत करतील. यानंतर शेतकऱ्यांना नूकसानभरपाई देण्याची कार्यवाही शासनाकडून होईल.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरीagricultureशेती