शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठ स्थापनेचा निर्णय दूरदृष्टीचा

By admin | Updated: August 28, 2014 00:22 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत खंडपीठ सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत खंडपीठाने चमकदार कामगिरी केली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेत खंडपीठ सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत खंडपीठाने चमकदार कामगिरी केली आहे. येथे दाखल होणारी प्रकरणे आणि त्यांच्या निपटाऱ्यांची संख्या पाहता, खंडपीठ स्थापनेचा निर्णय किती दूरदृष्टीचा होता, याचा प्रत्यय येतो, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३३ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम खंडपीठाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या संयोजक, खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुरेखा महाजन, उपाध्यक्षा अ‍ॅड. वैशाली शिंदे-मोरे, सचिव अ‍ॅड. अमोल काकडे, अ‍ॅड. प्रल्हाद खंडागळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी न्यायमूर्ती शहा म्हणाले की, येथे बाहेरील खंडपीठामधील न्यायमूर्ती येत नाहीत, या विधानात तथ्य नाही. कारण मुंबई, नागपूर, गोव्यासह अन्य खंडपीठांचे न्यायमूर्ती येथे येऊन राहिलेले आहेत. यावेळी त्यांनी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती हरदास यांचाही दाखला दिला. उच्च न्यायालयातील सध्याच्या आणि यापूर्वीच्या न्यायमूर्तींच्या नामावलीवर नजर टाकली असता त्यातील अनेक नावे ही या औरंगाबाद बारमधील आहेत. यावरून या खंडपीठाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच असल्याचे स्पष्ट होते आणि हे अभिमानास्पद आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत २ कोटी ३ लाख लोक राहतात. आजही ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावरून लोक न्याय मागण्यासाठी येथे येतात. पूर्वी हे अंतर खूप मोठे होते.