‘त्या’ नगरसेविकांचा निर्णय राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:14 IST2017-08-31T00:14:41+5:302017-08-31T00:14:41+5:30

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरविलेल्या दोन नगरसेविकांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय राखीव ठेवण्यात आला.

 The decision of the corporators is reserved | ‘त्या’ नगरसेविकांचा निर्णय राखीव

‘त्या’ नगरसेविकांचा निर्णय राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरविलेल्या दोन नगरसेविकांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय राखीव ठेवण्यात आला. बुधवारी दुपारी मंत्रालयातील नगरविकास विभागात डॉ पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीस भाजपाच्या अपात्र ठरविलेल्या अन्साबाई बाबर व मुक्ता पुंड या दोन्ही नगरसेविका आणि त्यांचा कोणताही प्रतिनिधी सुनावणीस हजर न राहिल्याने त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी पाटील यांनी निर्णय राखीव ठेवला.
अंबड शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील भाजपाच्या नगरसेविका अन्साबाई बाबर व भाजपाच्याच प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेविका मुक्ता पुंड यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने त्यांचे नगरसेविकापद रद्द करावे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती कुरेवाड व सावित्री गुडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार जून महिन्यात जिल्हाधिकाºयांनी दोन्ही नगरसेविकांना अपात्र घोषित केले होते.
डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे नगरसेविकांनी दाद मागितल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलीे. मात्र, तक्रारकर्त्याांनी याविराधोत औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली. खंडपीठाने नगरविकास राज्यमंत्र्यांना १० आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

Web Title:  The decision of the corporators is reserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.