अविश्वास ठरावावर आज होणार फैसला

By Admin | Updated: June 18, 2014 01:43 IST2014-06-18T00:48:07+5:302014-06-18T01:43:41+5:30

लोहारा : शिवसेनेच्या एकहाती ताब्यात असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरूध्द दाखल अविश्वास ठरावावर बुधवारी फैसला होणार आहे़

Decision to be held today on an unbelief resolution | अविश्वास ठरावावर आज होणार फैसला

अविश्वास ठरावावर आज होणार फैसला

लोहारा : शिवसेनेच्या एकहाती ताब्यात असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरूध्द दाखल अविश्वास ठरावावर बुधवारी फैसला होणार आहे़ सरपंच पतीवर आरोप करीत आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकारण ढवळून निघाले आहे़ दरम्यान, आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेनेचे वरिष्ठ नेतेमंडळी ऐनवेळी हस्तक्षेप करून हा ठराव बारगळणार की सदस्य ठराव पारित करून घेणार याकडे लक्ष वेधले आहे़
लोहारा ग्रामपंचायतीत १५ पैकी १० सदस्य शिवसेनेचे असून, तर काँग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचा एक असे पक्षीय बलाबल ग्रामपंचायतीत आहे़ शिवसेनेच्या सदस्यांनी नसीमाबी बागवान यांची सरपंच म्हणून निवड केली होती़ ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी सरपंच बागवान या वेळेवर मासिक बैठका, ग्रामसभा घेत नाहीत, जमा-खर्चाचा हिशोब देत नाहीत, त्यांचे पती नेहमी कामकाजात हस्तक्षेप करतात, नागरिकांना सुविधा देण्यात कुचराई केली जात आहे असे आरोप करीत १२ जून रोजी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता़ यात चार सदस्य हे शिवसेनेचे आहेत़ तर जवळपास दहा ते बारा सदस्य सरपंचांच्या विरोधात असल्याचा सूर शहरातील राजकीय वर्तुळात निघत आहे़ या अविश्वास ठरावाबाबत तहसीलदार ज्योती चौहाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी विशेष सभा होत आहे. शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता असतानाही अविश्वास ठराव दाखल करण्याची वेळ सदस्यांवर आल्याने वरिष्ठ नेतेमंडळी ऐनवेळी हस्तक्षेप करणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Decision to be held today on an unbelief resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.