मनपाच्या फेरफार विभागाचे विकेंद्रीकरण

By Admin | Updated: June 13, 2017 00:18 IST2017-06-13T00:15:54+5:302017-06-13T00:18:26+5:30

परभणी : महानगरपालिकेतील फेरफार विभागाचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, आता हा विभाग प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कार्यरत राहणार आहे़

Decentralization of MMC's Dismantling Section | मनपाच्या फेरफार विभागाचे विकेंद्रीकरण

मनपाच्या फेरफार विभागाचे विकेंद्रीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेतील फेरफार विभागाचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, आता हा विभाग प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कार्यरत राहणार आहे़
मनपाचा प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा, या उद्देशाने तीन प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़ या प्रभाग समित्यांमध्ये विविध विभागांचे कामकाज त्या त्या प्रभागांपुरते चालविले जाते़ प्रभाग समितीमुळे नागरिकांचीही गैरसोय दूर झाली आहे़ दरम्यान, आतापर्यंत फेरफार विभागाचे काम मुख्य कार्यालयातूनच चालविले जात होते़ ते आता प्रत्येक प्रभाग समितीकडे वर्ग करण्यात आले आहे़ यासाठी तीनही प्रभाग समित्यांमध्ये तीन लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ फेरफार विभागाप्रमाणेच मालमत्ता विभागही प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत सुरू करावा, अशी मागणी होत आहे़

Web Title: Decentralization of MMC's Dismantling Section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.