‘त्या’ मृत तरुणावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:09 IST2021-02-20T04:09:57+5:302021-02-20T04:09:57+5:30

हिरडपुरी शिवारातील विशाल चांदण्या भोसले याने गुरुवारी दुपारी दोन वाजता आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्याच्या आईने ...

The deceased was cremated by the police | ‘त्या’ मृत तरुणावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

‘त्या’ मृत तरुणावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

हिरडपुरी शिवारातील विशाल चांदण्या भोसले याने गुरुवारी दुपारी दोन वाजता आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्याच्या आईने त्याला नागरिकांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टरांनी घाटीत जाण्यास सांगितले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी मृताच्या आईवर मानसिक आघात झाल्याने त्या मृतदेह तेथेच सोडून गावी गेल्या. २४ तासापासून मृतदेह रुग्णालयात पडलेला होता. इकडे नातेवाईक नसल्याने शवविच्छेदन करता येत नसल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. स.पो.नि. अतुल येरमे स.पो.उ.नि. संजय मदने, आप्पासाहेब माळी यांनी मृताच्या आईला शोधून आणून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. आईची परिस्थिती बिकट असल्याने पोलिसांनी मानवता दाखवित स्वखर्चाने सोनवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी मृतावर अंत्यसंस्कार केले. यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

Web Title: The deceased was cremated by the police