१५ पर्यटकांना घेऊन आली डेक्कन ओडिसी

By Admin | Updated: December 1, 2014 01:27 IST2014-12-01T01:15:30+5:302014-12-01T01:27:03+5:30

औरंगाबाद : राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी- सुविधा अशा भव्यतेने नटलेली डेक्कन ओडिसी रेल्वे रविवारी औरंगाबादेत दाखल झाली;

Deccan Odyssey brings 15 tourists | १५ पर्यटकांना घेऊन आली डेक्कन ओडिसी

१५ पर्यटकांना घेऊन आली डेक्कन ओडिसी

औरंगाबाद : राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी- सुविधा अशा भव्यतेने नटलेली डेक्कन ओडिसी रेल्वे रविवारी औरंगाबादेत दाखल झाली; परंतु प्रवाशांची संख्या पाहता डेक्कन ओडिसीची जादू ओसरली का, असा प्रश्न काहीसा निर्माण होत आहे.
मुंबईहून प्रवास सुरू केल्यानंतर रविवारी सकाळी वेरूळ लेणी पाहण्यासाठी डेक्कन ओडिसी रेल्वे दौलताबाद स्थानकावर दाखल झाली. यावेळी दिलीप खंडेराय आणि त्यांच्या कला पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी टुरिझम प्रमोटर्स गील्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग यांची उपस्थिती होती. पर्यटक या ठिकाणाहून वेरूळ लेणी पाहण्यासाठी रवाना झाले.
दौलताबादहून डेक्कन ओडिसी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दाखल झाली. दुपारी येथून पर्यटकांना घेऊन ही राजेशाही रेल्वे आपल्या पुढील प्रवासासाठी ताडोब्याकडे रवाना झाली. मुंबई- औरंगाबाद (वेरुळ)- ताडोबा- अजिंठा लेणी- नाशिक- कोल्हापूर- गोवा- मुंबई या ठिकाणी पर्यटक जाणार आहेत.

Web Title: Deccan Odyssey brings 15 tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.