सिल्लोडच्या सहकार क्षेत्रात नॅशनल सूतगिरणीचे पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:41+5:302020-12-17T04:28:41+5:30

रोजगार निर्मितीसाठी एक पाऊल पुढे सिल्लोड : तालुक्यातील सहकार क्षेत्र वृद्धिंगत व्हावे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि कापूस ...

Debut of National Spinning Mills in the field of co-operation of Sillod | सिल्लोडच्या सहकार क्षेत्रात नॅशनल सूतगिरणीचे पदार्पण

सिल्लोडच्या सहकार क्षेत्रात नॅशनल सूतगिरणीचे पदार्पण

रोजगार निर्मितीसाठी एक पाऊल पुढे

सिल्लोड : तालुक्यातील सहकार क्षेत्र वृद्धिंगत व्हावे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने सिल्लोड येथे नॅशनल सूतगिरणीचे पदार्पण होत आहे. यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने परवानगी दिली आहे. नव्याने होणाऱ्या नॅशनल सूतगिरणी उभारणीला आता वेग आला आहे. असे असले तरी सहकार क्षेत्र उभारण्यासाठी भाग भांडवलाची आवश्यकता असते. ते आपल्या सहकार्याशिवाय शक्य नसल्याने तालुक्यातील व्यापारी बांधव, शेतकऱ्यांनी सूतगिरणीसाठी जास्तीत जास्त शेअर्स घेऊन सूतगिरणी उभारणीला हातभार लावावा, असे आवाहन सूतगिरणीचे मुख्य प्रवर्तक तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.

सिल्लोड येथे नॅशनल सूतगिरणीसाठी शासनाने मंजुरी दिल्यानंतर रविवारी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शहर व तालुक्यातील व्यापारी, डॉक्टर तसेच शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर बोलत होते. यावेळी सूतगिरणीचे प्रस्तावित संचालक केशवराव तायडे, शेख आमेर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, रोहित अग्रवाल, शेख यासिन बागवान आदींची उपस्थिती होती.

असे आहे कापसाचे उत्पादन

सिल्लोड तालुक्यात जवळपास ४० हजार हेक्टरवर कापूस लागवड होते. जवळपास ५१ हजार ७१३ मेट्रिक टन कापसाचे उत्पादन होते. सोयगाव तालुक्यात १० हजार ९०३ मेट्रिक टन, कन्नडमध्ये ३२ हजार ३२१ मेट्रिक टन व फुलंब्री तालुक्यात १० हजार ९०३ मेट्रिक टन इतके विक्रमी कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे सिल्लोड सूतगिरणी उभारणे गरजेचे आहे. केवळ कागदावर ही सूतगिरणी राहणार नाही. या सूतगिरणीतून एक हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे.

फोटो -

Web Title: Debut of National Spinning Mills in the field of co-operation of Sillod