बोरगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: June 18, 2014 01:44 IST2014-06-17T22:50:13+5:302014-06-18T01:44:54+5:30

जाफराबाद : तालुक्यातील बोरगाव फदाट येथील कर्जबाजारी शेतकरी अरूण गोपाल फदाट यांनी शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.

Debtor farmer suicides in Borga | बोरगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बोरगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जाफराबाद : तालुक्यातील बोरगाव फदाट येथील कर्जबाजारी शेतकरी अरूण गोपाल फदाट यांनी शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवार १७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला.
बोरगाव येथील शेतीवस्तीवर राहत असलेले अरूण फदाट (४२) यांनी आपल्याच शेतालगतच्या पट्टी नावाच्या शेतात विषारी द्रव सेवन केले. हा प्रकार त्यांच्या कुटूंबियांच्या लक्षात तब्बल दीड तासाने आला. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी अग्रवाल यांनी ते मयत झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी अजूनही घेतली नसून नातेवाईकांनी मात्र कर्जबाजारी असल्याचे सांगितले. तपासांती निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Debtor farmer suicides in Borga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.