कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 4, 2016 00:48 IST2016-10-04T00:28:44+5:302016-10-04T00:48:21+5:30
शिवना : येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकी व हातातील पीक वाया गेल्याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली .

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
शिवना : येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकी व हातातील पीक वाया गेल्याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली .
येथील शेतकरी भगवान किसन राऊत ( वय ४५ ) यांनी सोमवारी सकाळी गळफास लावून जीवन यात्रा संपवली. भगवान राऊत यांच्याकडे ३ एकर शेती होती. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी २ एकर शेती विकली होती. उर्वरित शेतीत लागवड करुन व रोजमजुरी करुन संसाराचा गाडा ते चालवत होते. यावर्षी त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र एैन मोसमात सोयाबीनचे पिक असतांना गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने हातातले पिक पुर्णपणे वाया गेले. भगवान राऊत यांच्यावर सहकारी सोसायटीचे व काही खाजगी सावकराचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. कर्ज फेडावे की उपवर आलेल्या मुलामुलींचे लग्न करावे, या विवंचनेतच सकाळी पत्नी आणि मुलगी पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्या असता भगवान राऊत यांनी छताच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. राऊत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आहे. महसूल विभागातर्फे तलाठी डी. जी. जरारे व मंडळ अधिकारी इसरार मिर्झा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अजिंठा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि मनोहर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश जगदाळे व मनोहर सपकाळ हे करीत आहे.