लोकमत युवा नेक्स्टतर्फे शुक्रवारी वादविवाद स्पर्धा
By Admin | Updated: December 17, 2014 00:38 IST2014-12-17T00:29:07+5:302014-12-17T00:38:10+5:30
औरंगाबाद :तरुणांमध्ये असलेले वक्तृत्वाचे गुण वृद्धिंगत करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे १९ डिसेंबर रोजी ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ ही वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लोकमत युवा नेक्स्टतर्फे शुक्रवारी वादविवाद स्पर्धा
औरंगाबाद : स्वत:चे मत परखडपणे मांडणे हे उत्कृष्ट वक्त्याचे गुण असतात. तरुणांमध्ये असलेले वक्तृत्वाचे गुण वृद्धिंगत करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे १९ डिसेंबर रोजी ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ ही वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजता देवगिरी महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा होईल. तरुणांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून ‘युवा नेक्स्ट’च्या माध्यमातून अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. वक्तृत्व, नृत्य, संगीत, फॅशन शो या माध्यमातून तरुणांना ‘लोकमत युवा नेक्स्ट’ हे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या वादविवाद स्पर्धेसाठी ‘फ्री मॅसेंजर हा तरुणांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत आहे का’ हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकमत भवन, जालना रोड येथे १८ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. युवा नेक्स्ट सदस्यांसाठी नावनोंदणी मोफत आहे, तर इतरांसाठी १०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/८४५ंल्ल७३ुं िया पेजला लाईक करा.