चोर असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: July 15, 2017 00:54 IST2017-07-15T00:53:03+5:302017-07-15T00:54:37+5:30
औरंगाबाद : चोर असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना आज (दि.१४) पहाटे घाटी रुग्णालयात मृत्यू झाला

चोर असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चोर असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना आज (दि.१४) पहाटे घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रतानगर परिसरातील प्रशांतनगर येथील एका केटरर्सच्या गोडाऊन परिसरात १० जुलै रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास ही घटना झाली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
विजय पांडुरंग सदाफुले (वय ३६, रा. छोटा मुरलीधरनगर), असे मृताचे नाव आहे.