हौदात पडल्याने कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: August 25, 2014 00:24 IST2014-08-25T00:04:34+5:302014-08-25T00:24:46+5:30
वाळूज महानगर : दारूच्या नशेत हौदात पडल्यामुळे एका ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात घडली.

हौदात पडल्याने कामगाराचा मृत्यू
वाळूज महानगर : दारूच्या नशेत हौदात पडल्यामुळे एका ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात घडली.
दादाभाऊ नरहरी आनंदे (३० रा. सी सेक्टर, एमआयडीसी वाळूज) हा कामगार शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत कामगार चौकातील एमआयडीसीची जलवाहिनी गेलेल्या वॉल चेम्बरच्या हौदावर बसून जेवण करीत होता. नशेत झोक गेल्यामुळे तो हौदात खाली पडल्यामुळे वॉल चेम्बरचे नट-बोल्ट लागून तो गंभीर जखमी झाला होता. ही माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार संजय अहिरे, पोहेकॉ. एस.बी. सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेत त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. मयत दादाभाऊ सप्तगिरी या कंपनीचा कामगार होता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. एस.वाय. गायकवाड हे करीत आहेत.