शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना ओढणीचा फास लागून बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 19:01 IST

लहान भावासोबत ओढणीने खेळत असताना गळफास लागला

औरंगाबाद: लहान भावासोबत ओढणीने खेळत असताना गळफास लागल्याने बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत झाल्याची घटना, उस्मानपुरा परिसरातील नागसेननगरमध्ये गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आरमान अजीम कुरेशी(वय १२,रा. नागसेननगर, उस्मानुपरा)असे मृत बालकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, आरमानचे वडिल हे मुंबईत पेंटर म्हणून कामाला गेले आहेत.  तर त्याची आई धुणी-भांडी करून घरसंसाराला आर्थिक हातभार लावते. आरमानला एक बहिण आणि आठ वर्षाचा लहान भाऊ आहे. गुरूवार दुपारी आरमानची आई कामावर गेली होती, यामुळे आरमान ,त्याची बहिण आणि लहान भाऊ घरी होते. आरमान लहान भावासोबत ओढणीशी खेळत होता.

दुपारी दोन अडिच वाजेच्या सुमारास आरमानला अचानक ओढणीचा गळफास लागल्याने तो बेशुद्ध पडला. बराचवेळ झाल्यानंतरही आरमान कोणतीही हालचाल करीत नसल्याने त्याच्या भावाने ही बाब घरात खेळत असलेल्या बहिणीला सांगितली. त्याचवेळी चिमुकल्यांची आई कामावरून घरी आली. तेव्हा त्यांना आरमान हा बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी रिक्षातून आरमानला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास आरमानचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके  आणि कर्मचाऱ्यांनी याविषयी उस्मानपुरा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा केला. शुक्रवारी सकाळी  आरमानचे घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. यात आरमानचा मृत्यू गळा दबल्या गेल्याने झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस