विजेचा शॉक लागून सालगड्याचा मृत्यू
By Admin | Updated: August 26, 2014 23:53 IST2014-08-26T23:26:06+5:302014-08-26T23:53:47+5:30
दैठणा: पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी विद्युत पंप लावत असताना विजेचा धक्का लागून एका सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना पोरवड येथे २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.

विजेचा शॉक लागून सालगड्याचा मृत्यू
दैठणा: पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी विद्युत पंप लावत असताना विजेचा धक्का लागून एका सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना पोरवड येथे २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.
परभणी तालुक्यातील पोरवड येथे अॅड.अडकिणे यांचे शेत आहे. यांच्या शेतावर सालगडी म्हणून कोडिंबा शंकर सुक्रे (४५) हे गेल्या तीन वर्षांपासून येथे कामावर होते. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नदी- नाले कोरडे असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी विहीर अथवा हातपंपाचा उपयोग करण्यात आला. कोडिंबा शंकर सुक्रे या सालगड्याने २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बैल धुण्यासाठी शेतातील विद्युत मोटार सुरु करीत असताना त्यांना विजेचा शॉक लागल्याने खाली पडले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले होते. (वार्ताहर)
पोळा सणावर दु:खाचे सावट
पावसाळ्यातील तीन महिने उलटूनही दैठणा व पोरवड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पोळा सण म्हटल की, बैलांना नदी अथवा तळ्यावर येऊन स्रान घातले जाते. परंतु, यंदा नदी-नाल्यांना पाणीच नसल्याने शेतकऱ्यांनी हातपंप, विहीरवर बैलांना स्रान घातले. याचाच फटका पोरवड शिवारात काम करणाऱ्या कोंिडंबा सुक्रे या सालगड्याचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. त्यामुळे पोळा सणावर दु:खाचे सावट होते.