वैजापूरच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:05 IST2021-05-05T04:05:06+5:302021-05-05T04:05:06+5:30
कोरोना नियमांचे पालन करण्यात नागरिक कमी पडत आहेत. त्यात राजकारणीही समोर असून विकास कामांचे उद्घाटने, इतर कार्यक्रमात ते गर्दी ...

वैजापूरच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक
कोरोना नियमांचे पालन करण्यात नागरिक कमी पडत आहेत. त्यात राजकारणीही समोर असून विकास कामांचे उद्घाटने, इतर कार्यक्रमात ते गर्दी जमवत असल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे. सकाळी सात ते अकरापर्यंत आवश्यक सेवा उपलब्ध असताना अनेकजण चोरट्या मार्गाने दुकाने उघडी ठेवत आहेत. वैजापूर तालुक्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या ४ हजार ६३९ इतकी आहे. त्यापैकी ३ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत, तर तालुक्यात आतापर्यंत ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात १८ रुग्ण शहरातील तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या कमी आहे. आरोग्य विभागाकडून संसर्ग रोखण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून गावागावांत जनजागृती केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी दिली.
चौकट
वैजापूर शहरानंतर शिऊरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या
ग्रामीण भागात सर्वाधिक १० मृत्यू हे नांदगाव येथे झाले आहेत, तर खंडाळा व लासूरगाव येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वैजापूर शहरानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या शिऊर येथे आहे. त्यापाठोपाठ खंडाळा, नागमठाण, लासूरगाव, लाडगाव, फकीराबादवाडी, वक्ती पानवी, कोल्ही, कापूस वाडगाव आदी गावांत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत.
फोटो कॅप्शन : वैजापूर शहरातील टिळक रोडवर सोमवारी बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती.
030521\img-20210503-wa0139_1.jpg
वैजापूर शहरातील टिळक रोडवर सोमवारी बाजार पेठेत अशी गर्दी झाली होती.