ट्रकच्या धडकेत प्राध्यापकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:47 IST2017-11-09T00:47:21+5:302017-11-09T00:47:25+5:30
नांदेड- लातूर राज्य महामार्गावरील ग्रामीण महाविद्यालयाच्या परिसरातील पेट्रोलपंपाजवळ वेगातील ट्रकने धडक दिल्याने प्रा. एम.पी. राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली.

ट्रकच्या धडकेत प्राध्यापकाचा जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड : नांदेड- लातूर राज्य महामार्गावरील ग्रामीण महाविद्यालयाच्या परिसरातील पेट्रोलपंपाजवळ वेगातील ट्रकने धडक दिल्याने प्रा. एम.पी. राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली. एसजीजीएस महाविद्यालयात प्रा. राजूरकर कार्यरत होते. नेहमीप्रमाणे कॉलेजचे काम संपवून राजूरकर गणेशनगरस्थित घरी जाण्यासाठी स्कुटीवरुन निघाले. पेट्रोलपंपासमोर असताना वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामीण पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, प्रा. राजूरकर यांच्या पार्थिवावर ९ नोव्हेंबर रोजी सकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जि.प.बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पंडितराव राजूरकर यांचे ते चिरंजीव होत.