शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड

By मुजीब देवणीकर | Updated: June 3, 2024 13:15 IST

मुकुंदनगर-राजनगर येथील धक्कादायक घटना, नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदनगर-राजनगर भागात विमानतळाच्या भिंतीलगत महापालिकेच्या ड्रेनेजची ४५० मिमी व्यासाची मोठी ड्रेनेज लाइन जाते. ही ड्रेनेज लाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. महापालिकेने ड्रेनेज लाइन दुरुस्त न करता बाजूला मोठा खड्डा करून पाणी सोडून दिले. या खड्ड्यात रविवारी दुपारी बकऱ्या चारणारा २१ वर्षीय नागेश नवनाथ गायकवाड याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आसपासच्या नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला.

मुकुंदनगर भागात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या नवनाथ गायकवाड यांना दोन मुले, तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्याचा मोठा मुलगा नागेश रविवारी नेहमीप्रमाणे विमानतळाच्या भिंतीलगत रेल्वेच्या लोखंडी पुलाजवळ बकऱ्या चारत होता. त्याच्या बकऱ्यांच्या मागे एक कुत्रा लागला होता. नागेश काठी घेऊन पळत आला. तुटलेल्या भिंतीच्या बाजूला मातीसदृश्य खड्डा दिसला. त्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तो ड्रेनेजच्या १५ फूट खोल पाण्यात पडला. त्याने वर येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, गाळातून बाहेर येऊ शकला नाही. आसपासच्या तरुणांनी आरडाओरड सुरू केली. अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. एका तासानंतर अग्निशमन दलाचे जवान आले. त्यांनी गळ टाकून मृतदेह बाहेर काढला. तोपर्यंत शेकडो नागरिक जमा झाले होते. मृतदेह आधी चिकलठाणा येथील मिनी घाटीत व नंतर उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला गेला.

ड्रेनेजचे पाणी खड्ड्यात का?घटनास्थळापासून अवघ्या पाचशे फुटांवर सिडकोने बांधलेला व सध्या मनपाकडे हस्तांतरित झालेला एसटीपी प्लांट आहे. या एसटीपी प्लांटला ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी जात होती. अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाइन दोन ठिकाणी फुटली. ते पाणी बाहेर येऊ लागल्याने महापालिकेच्या सुपीक डोक्याच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला मोठा खड्डा केला. त्यात पाणी सोडून दिले. ड्रेनेजची काही वर्षांपूर्वीच दुरूस्ती केली असती तर ही घटनाच घडली नसती, असे या भागातील संतप्त नागरिकांचे म्हणणे होते.

दोषींवर गुन्हे नोंदवाघडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मानवीय चुकीमुळे निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. महापालिकेला ही चूक टाळता आली असती. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.- राहुल निकम, प्रत्यक्षदर्शी कार्यकर्ता.

नागेशच्या मृत्यूला जबाबदार कोण?अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ही घटना घडली. नागेशच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतोय.

घटनेची नेमकी माहिती घेऊड्रेनेज विभागाचे कर्मचारी, अधिकारी १५ दिवसांपूर्वीच ड्रेनेज लाइन फुटल्याचे सांगत आहेत. दुरुस्तीसाठी कामही सुरू केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नेमकी अधिक माहिती घेऊन सांगता येईल.- ए. बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा.

दहा लाखांच्या मदतीची मागणीकुटुंबातील कर्ता मुलगा मनपाच्या हलगर्जीपणामुळे गेला. महापालिकेने तातडीने कुटुंबियांना दहा लाखांची मदत द्यावी. कुटुंबियांपैकी एकाला मनपात नोकरी द्यावी, अशी मागणी काॅंग्रेसचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAccidentअपघात