शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणात झोपलेल्या महिलेवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅक्टरने चिरडल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:31 IST

भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने अंगणात महिला बेशुद्धावस्थेत पडली होती.

सिल्लोड (औरंगाबाद): उकाडा सहन होत नसल्याने खातखेडा येथे रात्री घरासमोर अंगणात झोपलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा ट्रॅक्टरने चिरडल्याने गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला. लिलाबाई कचरू पहारे (रा.खातखेडा ता.सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लीलाबाई पहारे या बुधवारी रात्री आपल्या आईवडिलांच्या घरासमोर अंगणात झोपल्या होत्या. रात्री १२:३०  वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांना चिरडले. मोठा आवाज आल्याने नातेवाईक घराबाहेर आले. अंगणात बेशुद्धावस्थेत पडलेल्या लीलाबाई यांना नातेवाईकांनी प्रथम सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे आज पहाटे ६ वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात