मारहाणीत तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:47 IST2017-08-24T00:47:16+5:302017-08-24T00:47:16+5:30
कुस्त्याच्या फडाजवळ उभे असताना मागे सरक असे म्हणत पाच जणांनी बाळू नामदेव पटेकर (१९, रा.टाकरवण, ता.माजलगाव) याला मारहाण केली. यामध्ये बाळूचा मृत्यू झाला.

मारहाणीत तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कुस्त्याच्या फडाजवळ उभे असताना मागे सरक असे म्हणत पाच जणांनी बाळू नामदेव पटेकर (१९, रा.टाकरवण, ता.माजलगाव) याला मारहाण केली. यामध्ये बाळूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. बुधवारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुन्ना केशव घोलप, कृष्णा उर्फ चिवळ्या कचरू खोड, विजय दिनकर जाधव, कृष्णा ठेंगू घोलप, संजय सुभाष घोलप (सर्व रा.वासनवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. बाळू हा मंगळवारी वासनवाडी येथे गवळीबाबा यात्रेनिमित्त गेला होता. याचवेळी तो कुस्त्याच्या फडाकडे गेला. बाळू हा कुस्त्याच्या फडाजवळ उभा असताना विजयने मागे सरक असे म्हणत त्याच्या पायावर काठीने मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण वाढले. बाजूलाच उभा असणाºया चौघांसह अनोळखी व्यक्तींनी बाळूला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. धनराज दळवी यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, कृष्णास त्याच्या सासरवाडी असलेल्या खापर पांगरी येथून पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच संजय खोड याच्याही वासनवाडीतून मुसक्या आवळण्यात आल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेऊ, असे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी
सांगितले.