टिप्परच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: April 29, 2017 00:47 IST2017-04-29T00:44:39+5:302017-04-29T00:47:15+5:30
तुळजापूर : रस्ता रूंदीकरण कामावेळी टिपर पाठीमागे घेताना मागील चाकात अडकून एका ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़

टिप्परच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
तुळजापूर : रस्ता रूंदीकरण कामावेळी टिपर पाठीमागे घेताना मागील चाकात अडकून एका ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील सांगवी-मार्डी शिवारात घडला असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे़ तालुक्यातील सांगवी मार्डी शिवारातील काम चालू असलेल्या पुलावर चालक त्याच्याकडील टिपर पाठीमागे घेत होता़ त्यावेळी पाठीमागे असलेला अजितकुमार जितेंद्र सिंह (वय-३२ रा बोरीबरार कासिमाबाद गाजीयापूर उत्तर प्रदेश) हा इसम सापडून चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. याबाबत दिलीपकुमार जयराम सिंह (रा़अकोल) यांनी दिलेल्या फिर्याद वरुन टिपर चालक जयराज बाबुरावा विटेकर (रा़ नाशिक) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(वार्ताहर)