वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: July 6, 2014 00:23 IST2014-07-06T00:08:19+5:302014-07-06T00:23:06+5:30
जालना: तालुक्यातील दुधना काळेगाव येथील दुधना नदीच्या पात्रात वाळू उपसा करीत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू
जालना: तालुक्यातील दुधना काळेगाव येथील दुधना नदीच्या पात्रात वाळू उपसा करीत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
दुधना काळेगावातील दुधना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. शुक्रवारी या ठिकाणी पात्रातून वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी अचानक सिडी कोसळल्याने हे काम करीत असलेला मजूर गणेश दामोधर डमाळे हा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबला. त्याला तात्काळ इतर मजुरांनी बाहेर काढले. आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. तालुका जालना पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार अंभोरे हे करीत आहे. (प्रतिनिधी)