विद्यापीठातील इमारतीवरून पडून मजूर महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:41:24+5:302014-07-13T00:45:52+5:30
औरंगाबाद : विद्यापीठात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी घडली.

विद्यापीठातील इमारतीवरून पडून मजूर महिलेचा मृत्यू
औरंगाबाद : विद्यापीठात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी घडली.
निर्मला फकिरा बोरडे (४०, रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी), असे त्या मजूर महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, विद्यापीठात लेडीज हॉस्टेलच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. निर्मला बोरडे या तेथे मजुरी करीत होत्या. काम सुरू असताना तोल जाऊन त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
उपचारासाठी घाटीत दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.