विजेच्या धक्क्याने शेळीचा मृत्यू;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:05+5:302020-12-17T04:30:05+5:30

घाटनांद्रा : विद्युत पोलवरील सर्व्हिस वायर तुटली अन् ती खाली असलेल्या शेळीवर जाऊन पडल्याने शेळीचा जागेवरच मृत्यू झाला. ही ...

Death of a goat by electric shock; | विजेच्या धक्क्याने शेळीचा मृत्यू;

विजेच्या धक्क्याने शेळीचा मृत्यू;

घाटनांद्रा : विद्युत पोलवरील सर्व्हिस वायर तुटली अन् ती खाली असलेल्या शेळीवर जाऊन पडल्याने शेळीचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घाटनांद्रा येथील शिवाजी चौकात घडली. सुदैवाने या ठिकाणी अन्य कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

शिवाजी चौकात असलेल्या विद्युत पोलवरील सर्व्हिस वायरवर वानराने उडी मारली. ते वायर खाली पोलजवळ असलेल्या शेळीवर पडले. त्यामुळे शेळीचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी गावात रिमझिम पाऊस झालेला होता. सर्वत्र जमीन ओली झालेली होती. तर चौकात काही ठिकाणी पाणीदेखील साचलेले होते. अचानक विद्युत पोलवरील वायर तुटले. त्यात विद्युतप्रवाह सुरू होता. सुदैवाने या चौकात कोणीही नसल्याने मोठा अपघात टळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ही घटना घडताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना

फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व्हिस वायरची दुरुस्ती केली. तर जीर्ण झालेल्या तारा बदलण्याची मागणी गावकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याकडे फोनद्वारे केली आहे.

Web Title: Death of a goat by electric shock;