विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविताना पित्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:44 IST2018-04-29T00:43:52+5:302018-04-29T00:44:17+5:30

विहिरीत पडलेल्या अडीच वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी तालुक्यातील निपाणी येथे घडली. मुलगा व पित्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने निपाणी गावावर शोककळा पसरली आहे.

 The death of the father while saving the boy lying in the well | विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविताना पित्याचाही मृत्यू

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविताना पित्याचाही मृत्यू

देवगाव रंगारी : विहिरीत पडलेल्या अडीच वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी तालुक्यातील निपाणी येथे घडली. मुलगा व पित्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने निपाणी गावावर शोककळा पसरली आहे.
निपाणी येथील रुद्र श्रावण कुºहाडे हा अडीच वर्षाचा मुलगा आपल्या शेतातील विहिरीत पडल्यानंतर वडील श्रावण गोविंद कुºहाडे यांनी त्यास वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. परंतु यात दोघांचाही पाण्यात बुडून झाला. गावकरी व पोलिसांनी धाव घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. स्वप्ना शहापूरकर करीत आहेत.

 

Web Title:  The death of the father while saving the boy lying in the well

टॅग्स :