विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: August 26, 2014 23:56 IST2014-08-26T23:44:58+5:302014-08-26T23:56:42+5:30
औंढा नागनाथ : शेतकऱ्याला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज तांडा येथे घडली.

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
औंढा नागनाथ : पूजा करण्यासाठी शेतामधून बेल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज तांडा येथे सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ढेगज तांडा येथील अशोक विठ्ठल बिरगड (३०) हा शेतकरी शेवटच्या श्रावण सोमवार असल्याने पूजा करण्यासाठी बेल आणण्यास बाहेर गेला. परंतु बराच वेळ ते घरी न आल्याने शोध घेण्यासाठी त्याचा भाऊ ज्ञानेश्वर बिरगड हा शेतात गेला. ढेगज तांडा शिवारातील शेषराव लालू राठोड यांच्या शेताजवळ असलेल्या बेलाच्या झाडावर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत अवस्थेमध्ये आढळून आला असल्याची माहिती ज्ञानेश्वर बिरगड यांनी औंढा पोलिसांना दिली. त्यावरून पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नूरखाँ पठाण करीत आहेत. (वार्ताहर)
दोघांना मारहाण
शिरडशहापूर: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, दोघांना मारहाण झाल्याची घटना वसमत तालुक्यातील खांबाळा येथे २४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या प्रकरणी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांबाळा येथील सारीका धवसे हिच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल होटगीर, दत्तराव होटगीर, प्रदीप होटगीर, विलास होटगीर यांच्याविरूद्ध कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर)