र्पदंश झालेल्या बालिकेचा औषधोपचाराअभावी मृत्यू औ
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T00:52:37+5:302014-07-08T01:06:26+5:30
सरंगाबाद : साप चावल्यानंतर वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने प्रीती संजय सोनटक्के या सहावर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली.

र्पदंश झालेल्या बालिकेचा औषधोपचाराअभावी मृत्यू औ
सरंगाबाद : साप चावल्यानंतर वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने प्रीती संजय सोनटक्के या सहावर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली. अॅन्टी स्नेक व्हेनम (एएसव्ही) हे इंजेक्शन न मिळाल्यानेच आपल्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
मयूर पार्क, सुरेवाडी येथे राहणारे संजय सोनटक्के हे वॉचमन म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते कुटुंबासह घरात झोपलेले असताना त्यांच्या प्रीती या बालिकेला रात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास सापाने चावा घेतला. ही घटना त्यांना समजताच त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षाचा शोध सुरू केला. त्याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी संजय आणि बेशुद्ध प्रीतीला पाहिले. त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता, दोघांना पोलीस गाडीत बसविले आणि तात्काळ घाटीत नेले. अपघात विभागातील डॉक्टरांनी प्रीतीला तपासून तिला वॉर्ड क्रमांक २४-२५ मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. संजयने प्रीतीला वॉर्ड क्रमांक २४ येथे नेले. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासले आणि आपल्याकडे साप चावल्यानंतर दिले जाणारे इंजेक्शन नसल्याचे सांगितले. सर्पदंशांवरील उपचाराचे इंजेक्शन नसल्याचे सांगून घाटीतील डॉक्टरांनी त्या बालिकेला कोणत्याही सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितल्याने पुढील घटना घडली.
सुमारे पंधरा ते वीस मिनिटे प्रीती पलंगावर तडफडत होती. या काळात डॉक्टर तिच्यावर उपचार करीत नसल्याचे पाहून संजय यांनी तिला खाजगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि तेथून तिला उचलून ते रिक्षाने सिडकोतील रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील डॉक्टरांनी आपल्या मुलीला तातडीने साप चावल्यानंतरची लस न दिल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सोनटक्के यांनी केला आहे. विभागप्रमुख डॉक्टर प्रशांत पाटील यांनी मात्र या घटनेला मुलीचे वडीलच जबाबदार असल्याचे विधान केले. तिला अॅडमिट केलेच नाही.
वॉर्डात लस नसेल, तर बाहेरून आणली जाते
रुग्ण रात्री घाटीत दाखल झाल्यानंतर वॉर्ड क्रमांक २४ मधील डॉक्टरांनी त्या बालिकेला अॅडमिट करण्यासाठी पेपर काढण्यास सांगितले होते.
मात्र, तिला अॅडमिट न करताच तिला घाटीतून खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. अॅन्टी स्नेक व्हेनम वॉर्डात उपलब्ध नसेल, तर बाहेरून मागवून रुग्णास दिली जाते.
या बाबतीत नेमके काय झाले हे माहीत नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी.एल. गट्टाणी यांनी सांगितले. याविषयी तक्रार आल्यास चौकशी करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.