मरणानंतरही संपत नाही वडवळकरांची मरणयातना
By Admin | Updated: December 3, 2015 00:34 IST2015-12-03T00:22:29+5:302015-12-03T00:34:30+5:30
भरतसिंह ठाकूर , वडवळ नागनाथ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ हे गाव़ जवळपास पंधरा हजार लोकसंख्या असून, येथे विविध जातीधर्माचे लोक जिवंत असताना गुण्यागोविंदाने राहतात़

मरणानंतरही संपत नाही वडवळकरांची मरणयातना
भरतसिंह ठाकूर , वडवळ नागनाथ
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ हे गाव़ जवळपास पंधरा हजार लोकसंख्या असून, येथे विविध जातीधर्माचे लोक जिवंत असताना गुण्यागोविंदाने राहतात़ परंतू, मृत्यूनंतर बऱ्याच समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नाही़ ज्यांना आहे तीही जागा अपुरी पडत आहे़त्यामुळे जिवंतपणी माणसाला आपल्या हक्कासाठी व विकासासाठी सतत झुंज द्यावी लागते़ मात्र मृत्यूनंतरही हालअपेष्टा यातना सहन कराव्या लागत असल्याचे विदारक चित्र येथील जनतेच्या मरणानंतरही संपत नाही़ वडवळच्या नागरिकांच्या मरणयातना अशीच स्थिती म्हणावी लागेल़
याबाबत अधिक माहिती अशी की, अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने येथे राहतात़ परंतू, सर्वात मोठ्या असणाऱ्या लिंगायत समाजासाठी केवळ २० गुंठे जमीन स्मशानभूमीसाठी आहे़ सध्याच ही जागा अपुरी पडत आहे़ स्वतंत्र जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे़ मराठा, मुस्लिम समाजासाठी मस्जिद कमेटीच्या ६३ आर जमिनीची नोंद आहे़ परंतू, त्याला अर्धवट संरक्षण भिंत आहे़ मराठा व इतर समाजाला प्रेत जाळण्यासाठी अपुऱ्या जागेत एकच शेड आहे़ यांनाही मोठ्या जागेची आवश्कता आहे़ चांभार समाजासाठी तर स्मशानभूमीच नाही़ जबरदस्तीने जुन्या वहिवाटीखाली अनाधिकृत ६ आर जागा आहे तीही वादग्रस्त आहे़ त्यातच अंत्यविधीच्या क्रिया पार पाडल्या जातात़प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही समाजाने शासनाकडे जागेची मागणी केली आहे़ अद्यापही ती पूर्ण झाली नाही़ तसेच अनुसूचित जातीसाठी केवळ १० आर जमीन आहे़ भविष्यात सर्व समाजाला जागेचा प्रश्न भेडसावणार आहे़