जीपच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

By Admin | Updated: March 13, 2015 00:41 IST2015-03-13T00:35:16+5:302015-03-13T00:41:33+5:30

माणकेश्वर : भरधाव वेगातील जीपने जोराची धडक दिल्याने एका ४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी दुपारी घडली असून,

The death of a chimukale in the jeep | जीपच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

जीपच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू


माणकेश्वर : भरधाव वेगातील जीपने जोराची धडक दिल्याने एका ४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, परंडा येथील समृध्दी प्रदीप किरमे (वय-०४) ही मुलगी बुधवारी दुपारी माणकेश्वर-भांडगाव मार्गावरील सर्जेराव सदाशिव अंधारे यांच्या शेताजवळील रोडवरून जात होती़ त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या जीपने (क्ऱएम़एच़२५-टी़ १७८) समृध्दी हिस जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या समृध्दी हिला बार्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिस मृत घोषित केले़ याबाबत विठ्ठल भगवान किरमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीपचालक नेताजी महादेव पवार याच्याविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ तपास जमादार एस़आऱ सर्जे, विधाते हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: The death of a chimukale in the jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.