शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांनो, आता आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता विसरा!

By राम शिनगारे | Updated: May 29, 2025 06:27 IST

सेवानिवृत्तांचे वेतन, महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी शासन स्वतंत्र निर्णय घेईल

राम शिनगारे 

छत्रपती संभाजीनगर : संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘फायनान्स ॲक्ट-२०२५’ मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता, वेतन आयोगाचा लाभ आता मिळणार नाही. नव्या कायद्यानुसार सेवानिवृत्तांची जबाबदारी ही शासनाची असणार नाही. त्यामुळे आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता  सेवानिवृत्तांसाठी नसतील. सेवानिवृत्तांचे वेतन, महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी शासन स्वतंत्र निर्णय घेईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.  

केंद्र, राज्य शासनाच्या आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १९७२च्या पेन्शन कायद्यानुसार पेन्शन मिळते. यानुसार सर्व सेवानिवृत्तांना न्याय मिळत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठाने सेवानिवृत्तांमध्ये भेदभाव करता येणार नाही, याविषयी १७ डिसेंबर १९८२ रोजी ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यामुळे सेवानिवृत्तांना वेतन आयोग, महागाई भत्ता लागू झाला होता. 

कर्मचारी सेवानिवृत्त झाला, त्या शेवटच्या महिन्याच्या मूळ वेतनावर ५० टक्के पेन्शन देण्याचा नियम घटनापीठाच्या निकालामुळे तयार झाला. त्यामुळे निकाल दिलेला १७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शनर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो, परंतु नव्या कायद्यातील तरतुदींमुळे हे मोडीत निघणार आहे.

नव्या कायद्यानुसार वेतन आयोग लागू नाही  

सेवानिवृत्तांना वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळणार नाही.

१९७२ चा पेन्शन कायदा लागू असणार नाही. 

संभाव्य आठवा वेतन आयोग जुन्या सेवानिवृत्तांना मिळणार नाही.

जेव्हा वेतनवाढीबाबत शासन निर्णय घेईल. तो त्याच तारखेपासून लागू होईल. थकबाकी मिळणार नाही. याविरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही.

पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला निर्णय ऐतिहासिक होता. या निकालाने प्रस्थापित केलेल्या समानतेला नव्या कायद्याने केराची टोपली दाखवली आहे- प्राचार्य एम. ए. वाहूळ, अध्यक्ष, सेवानिवृत्त प्राध्यापक संघटना 

केंद्राच्या कायद्यानेच सेवानिवृत्तांमध्ये असमानता निर्माण केली आहे. त्यांचे न्याय्य हक्कच काढून घेतले आहेत - डॉ. जे. एम. मंत्री, सचिव, अक्युसॅट 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी