चारशे कामगारांचा संप चालूच
By Admin | Updated: July 25, 2014 00:31 IST2014-07-24T23:59:53+5:302014-07-25T00:31:19+5:30
धर्माबाद : तालुक्यातील बाळापूर शिवारात असलेल्या पाओनिअर डिस्टलरीज कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत संप चालविल्याने १४ दिवसांपासून कारखान्याची चिमणी बंद आहे.

चारशे कामगारांचा संप चालूच
धर्माबाद : तालुक्यातील बाळापूर शिवारात असलेल्या पाओनिअर डिस्टलरीज कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत संप चालविल्याने १४ दिवसांपासून कारखान्याची चिमणी बंद आहे.
कामगारांवर कंपनीने आरोप करुन न्यायालयात धाव घेतली असता त्यांचा अर्ज फेटाळला. कामगारांनी बोलणी करण्याची तयारी दर्शविली असून कंपनी मात्र आपल्या हट्टी धोरणावर ठाम आहे. पाओनिअर डिस्टलरी कंपनीचे व्यवस्थापक के. श्रीधर यांनी संप फोडण्यासाठी कामगारांवर खोटे आरोप करुन जालना येथील न्यायालयात धाव घेतली होती. परंतु कामगारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकूण न्यायाधिशांनी कंपनीचा अर्ज फेटाळला. व्यवस्थापकांनी येथील कंत्राटी असलेल्या कामगारांना बोलावून कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न कला पण यश आले नाही. संप फोडण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला.
कामगार संघटनेनी एकजुटीने संप चालविण्याचा निर्णय घेतला असला तरी सन्मानाने तडजोड, बोलणी करण्याची तयारी दर्शविली. परंतु कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हट्टी स्वभावामुळे संप चिघळत आहे. कंपनीचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. सीटू संघटनेचे अध्यक्ष अॅड. कॉ. उद्धव भवलकर व जनरल सेक्रेटरी नवीनकुमार सिरपोर, कामगौडे शंकर व सर्व कामगारांनी कंपनीने बोलणीसाठी बसावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)