‘डेडपूल’चं मार्व्हल युनिव्हर्समध्ये पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:02 IST2021-01-14T04:02:06+5:302021-01-14T04:02:06+5:30

‘डेडपूल’ हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु, अर्वाच्च संभाषण, आक्षेपार्ह दृश्य आणि मोठ्या प्रमाणावर इंटिमेट सीन्स ...

Deadpool returns to Marvel Universe | ‘डेडपूल’चं मार्व्हल युनिव्हर्समध्ये पुनरागमन

‘डेडपूल’चं मार्व्हल युनिव्हर्समध्ये पुनरागमन

‘डेडपूल’ हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु, अर्वाच्च संभाषण, आक्षेपार्ह दृश्य आणि मोठ्या प्रमाणावर इंटिमेट सीन्स असल्यामुळे डेडपूल फ्रेंचाईजी केवळ दोन चित्रपटानंतरच थांबवण्यात आली होती. आता मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे विशेष कार्यकारी अधिकारी केव्हिन फायगी यांनी डेडपूलच्या आर-रेटेड चित्रपटांना हिरवा कंदील दाखवत थेट तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. डेडपूल ही सुपरहिरो व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता रायन रेनॉल्ड याने देखील एका ट्‌वीटच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. भारतात मात्र डेडपूलवरील बंदी अद्याप अधिकृतरित्या उठवलेली नाही.

परिणितीच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

परिणिती चोप्राचा आगामी सिनेमा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. परिणितीचा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर २६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर प्रदर्शित होताच परिणितीने चित्रपटातील एक पोस्टर देखील शेअर केले आहे. यात परिणिती एका अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारत असून एका हरवलेल्या व्यक्तीच्या शोधमोहिमेमध्ये गुंतत जाताना दिसत आहे. चित्रपटात अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हरी आणि अविनाश तिवारी असे सहकलाकार आहेत. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. याची कथा पॉला हॉकिन्सच्या कादंबरीवर आधारित होती.

अद्याप माझं लग्नाचं वय झालेलं नाही

शेहनाज गिल ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह चॅट सेशन केलं होतं. यावेळी एका चाहत्याने तर, तू अभिनेता सिद्धार्थ शुल्कासोबत लग्न करणार आहेस का? असा थेट सवाल तिला केला. यावर क्षणाचाही विलंब न करताना तिनं थेट असे काही उत्तर दिले, की सारे अवाक्‌ झाले. 'मी स्ट्रगल करणारी अभिनेत्री नाही. माझ्याकडे बरंच काम आहे. जर मी रिकामटेकडी असती तर नक्कीच लग्न केलं असतं अन् एवढ्यात मला दोन मुलं देखील झाली असती. परंतु, अद्याप मी लग्नाचा विचार केलेला नाही. शिवाय माझं लग्नाचं वय देखील झालेलं नाही. जेव्हा मी लग्नाचा निर्णय घेईन, तेव्हा सर्व चाहत्यांना सांगेनच." असं उत्तर तिनं आपल्या चाहत्यांना दिलं.

Web Title: Deadpool returns to Marvel Universe