जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
By Admin | Updated: February 14, 2016 00:04 IST2016-02-14T00:04:57+5:302016-02-14T00:04:57+5:30
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मागील नंबर टेकच्या बाजूला एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मागील नंबर टेकच्या बाजूला एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळून आला़ घटनेची माहिती मिळताच सपोनि किशोर मानभाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ मयत महिला ही संपूर्ण जळालेली असल्याने ओळख पटली नाही़ महिलेच्या पायाच्या गुडग्याच्या खालील भाग कट झालेला आहे़ तर एक पाय जळालेल्या अवस्थेत बाजूला पडला आहे़ याबाबत ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ (वार्ताहर)