‘डीसीसी’ची भूम शाखा फोडली
By Admin | Updated: November 30, 2014 00:55 IST2014-11-30T00:53:07+5:302014-11-30T00:55:11+5:30
भूम : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भूम शाखेची तिजोरी गॅसकटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी ७९ हजार ८३२ रूपयांची रोकड लंपास केली़

‘डीसीसी’ची भूम शाखा फोडली
भूम : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भूम शाखेची तिजोरी गॅसकटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी ७९ हजार ८३२ रूपयांची रोकड लंपास केली़ ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, ही रक्कम निराधाराच्या अनुदानाची असल्याचे बँकेकडून पोलिसांना सांगण्यात आले़
पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेची भूम शहरातील गोलाई चौकात शाखा आहे़ या शाखेच्या मागील बाजूचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला़ आतील तिजोरी गॅसकटरच्या सहाय्याने तोडून निराधार अनुदानाची रक्कम ७९ हजार ८३२ रूपये लंपास केले़ ही घटना शनिवारी सकाळी समोर आली़ या बाबत शाखाधिकारी संजय खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपानि बी़बी़वडदे हे करीत आहेत़ (वार्ताहर)