डीबीए अ, पीडब्ल्यूडी संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:53 IST2017-12-02T00:53:23+5:302017-12-02T00:53:38+5:30
गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए अ संघाने एमआयटी संघावर तर पीडब्ल्यूडी संघाने लिप फास्टनर संघावर मात केली.

डीबीए अ, पीडब्ल्यूडी संघ विजयी
औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए अ संघाने एमआयटी संघावर तर पीडब्ल्यूडी संघाने लिप फास्टनर संघावर मात केली.
पहिल्या सामन्यात डीबीए अ संघाविरुद्ध एमआयटी हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून सतीश डहाळेने ३१, केदार काळेने २७ धावा केल्या. डीबीए अ संघाकडून संदीप देगावकर, मोहित घाणेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डीबीए अ संघाने विजयी लक्ष्य ११.४ षटकांत १ बाद १०० धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून सतीश भुजंगेने ३३ चेंडूंत नाबाद ५० व चैतन्य जोशीने नाबाद २४ धावा केल्या. एमआयटीकडून आकाश लोखंडेने १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात पीडब्ल्यूडीविरुद्ध लिप फास्टनरने ९ बाद ९५ धवा केल्या. त्यांच्याकडून प्रणव राजळेने २ चौकारांसह २७ आणि राहुल पाटीलने १२ धावा केल्या. पीडब्ल्यूडीकडून रवींद्र तोंडेने १५ धावांत ३ गडी बाद केले. श्याम टाकळकर व मनोज दाभाडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मनोज घोडके व प्रसाद सोनवणे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात पीडब्लयूडी संघाने १८.३ षटकांत ३ गडी गमावून ९८ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. पीडब्ल्यूडीकडून योगराज चव्हाणने ६ चौकारांसह ३५ व मनोज घोडकेने नाबाद २८ धावा केल्या. श्याम टाकळकरने १६ व मनोज दाभाडेने नाबाद ११ धावा केल्या. लिप फास्टनरकडून अमोल हाके याने २५ धावांत २ गडी बाद केले.