शहरात दिवसभरढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:01+5:302020-12-17T04:26:01+5:30

रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद औरंगाबाद : दैवत फाऊंडेशन आणि संघर्ष फाऊंडेशन यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ...

Daytime weather in the city | शहरात दिवसभरढगाळ वातावरण

शहरात दिवसभरढगाळ वातावरण

रक्तदान शिबिरास

उत्स्फुर्त प्रतिसाद

औरंगाबाद : दैवत फाऊंडेशन आणि संघर्ष फाऊंडेशन यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अमृता ब्लड बँकेतर्फे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी आकाश मुंडे, हेमंत देशमुख, सूरज मुंडे, ऋषी चौहान आदी उपस्थित होते.

पर्यटन बसवरील

कर्मचाऱ्याची चाचणी

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या वेरुळ, अजिंठा लेणीसाठी धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या चालक-वाहकांची आरोग्य अधिकाऱ्यामार्फत कोरोना चाचणी करण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी काळजी घेतली जात आहे. बसचे निर्जंतुकीकरण केले जाते, असे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले.

कंत्राटी वीज कामगारांचे

मंगळवारी आंदोलन

औरंगाबाद : भरतीत प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळणे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे १५ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांना

लस देण्याची मागणी

औरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा म्हणून अनेक महिन्यांपासून सेवा देत आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने कोविड लस देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Daytime weather in the city