छत्रपती संभाजीनगर : शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेचा ही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथील वेदांतनगर भागात मंगळवारी घडली. मृत दोघी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या पत्नी व आई आहेत.
विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी हे वेदांतनगर भागात आई, पत्नीसह राहतात. दीपावलीच्या सुट्यानिमित्त त्यांच्या आई नाशिकला भावाकडे गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी ते घरी असताना आई रुक्मिणी रूपचंद परदेशी (९६) यांचे निधन झाल्याची बातमी भावाकडून समजली. ते लगेच नाशिकला जाण्याच्या तयारीत असतानाच पत्नी विजया परदेशी (वय ६२) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घाटी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
या दोघींमध्ये आई-मुलीप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते असल्यामुळे त्यांना हा धक्का सहन झाला नसल्याचे कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले. रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विजया परदेशी यांच्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
Web Summary : In a tragic incident, a woman in Chhatrapati Sambhajinagar died of a heart attack upon hearing of her mother-in-law's death. Vijaya Pardeshi, wife of Suresh Pardeshi, couldn't bear the news of Rukmini's passing. The family mourns the double loss.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में सास की मौत की खबर सुनकर बहू को दिल का दौरा पड़ा और उसकी मौत हो गई। सुरेश परदेशी की पत्नी विजया परदेशी, अपनी सास रुक्मिणी के निधन की खबर बर्दाश्त नहीं कर पाईं। परिवार में शोक की लहर।