दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा
By Admin | Updated: December 25, 2015 00:02 IST2015-12-24T23:52:45+5:302015-12-25T00:02:47+5:30
परभणी : दत्त नामाच्या जयघोषात परभणी शहरासह जिल्हाभरात विविध दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा २४ डिसेंबर रोजी पार पडला.

दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा
परभणी : दत्त नामाच्या जयघोषात परभणी शहरासह जिल्हाभरात विविध दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा २४ डिसेंबर रोजी पार पडला. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सर्व मंदिरात दत्त जन्म साजरा झाला.
परभणी शहरातील श्रीक्षेत्र दत्तधाम, दत्तनगर येथील दत्तमंदिर, नांदखेडा रोडवरील दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र, शिवाजीनगर, सिंचननगर, विकासनगर, पाचलेगावकर मठ संस्थान, गुंज मठ वसमतरोड या मुख्य मंदिरात दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मागील आठ दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त विविध मंदिरात श्री गुरुचरित्र पारायण, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यातील अनेक कार्यक्रमांची सांगता दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने झाली. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दत्तजन्म झाला. यावेळी सर्वच मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. तसेच पालम तालुक्यातील आरखेड येथील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गोदावरी नदी व गळाटी नदीच्या त्रिवेणी संगमावर दत्तात्रयाचे मंदिर असून यानिमित्त दिवसभर प्रवचन, भजन, अभिषेक आदी कार्यक्रम पार पडले. येथे दर्शनासाठी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली होतीे. (प्रतिनिधी)