शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

...म्हणे वानरांपासून माणसाची उत्पत्ती नाही, डार्विनचा सिद्धांत खोटा; मोदींच्या मंत्र्यांचा अजब शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 4:39 PM

आपल्या पूर्वजांपासून ते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली असे कुणीच म्हणालेले नाही. कुणी मनुष्य जंगलात गेला व त्याने तिथे वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय

औरंगाबाद :  वानरांपासून माणसाच्या उत्क्रांतीचा डार्विन यांनी मांडलेला आणि सध्या जगन्मान्य असलेला मानवाच्या उत्क्रांतीचा सिध्दांत खोटा असल्याचे नवेच संशोधन मोदी सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी केले आहे. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते शुक्रवारी औरंगाबादेत आले होते.

मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या डॉ. सिंग यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विचित्र विधाने केली. वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कुणी पाहिले आहे काय चमत्कारिक प्रश्नच त्यांनी विचारला. आपल्या पूर्वजांपासून ते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली असे कुणीच म्हणालेले नाही. कुणी मनुष्य जंगलात गेला व त्याने तिथे वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय, तसा दावाही कुणी केलेला नाही. मात्र, आम्हाला शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात डर्विंन या शास्त्रज्ञाचा तोे सिद्धांत शिकविला जातो. डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत  खोटा आणि  अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात ३५ वर्षापूर्वीच सिध्द केल्याचा दावाही डॉ. सिंग यांनी केला. त्यापुढे जाऊन सिंग म्हणाले की, शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकावा. पृथ्वीवर सुरुवातीपासून मनुष्य आहे व मनुष्य म्हणूनच तो राहणार आहे. यापुढे अभ्यासक्रमांतही असेच शिकविले गेले पाहिजे.

त्यांच्या मुलांना जंगलात नेऊन सोडा-सत्यपाल सिंह यांचे आणखी एक गमतीशीर विधान यावेळी केले. ते म्हणाले, ‘काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, पशू,पक्षी आणि  जनावरांचा आवाज ऐकून मनुष्य भाषा बोलण्यास शिकला. मी म्हणतो की, असे बोलणार्‍यांच्या मुलांना काही वर्ष जंगलात नेऊन सोडा.  बघू, तेथील पशू,पक्ष्यांच्या आवाजावरुन ते कोणती भाषा शिकतात ते’.  सूर्य, पृथ्वी, चंद्राच्या निर्मितीनंतर भगवंतांनी वेदवाणी केली व जगातला मुनष्य तेच वेद पहिले शिकला, असेही ते बोलून गेले. इश्वराच्या ज्ञानरुपी गंगेतून मनुष्य वेद म्हणण्यास शिकला. हे सत्य आहे, असा दावा त्यांनी केला.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी