शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

दारणा, गंगापूर धरणांतून ६५०० क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Updated: August 1, 2016 00:06 IST

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल. गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. तर वरच्या भागातील २१ धरणांमध्ये सरासरी ५२ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा झाला आहे. तरीही आतापर्यंत वरच्या भागातून जायकवाडीत पाणी आलेले नाही. उलट पालखेड, मुळा, नांदूर-मधमेश्वर या वरच्या भागातील प्रकल्पाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. अजूनही तीन धरणांचे कालवे सुरूच आहेत; परंतु आता दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वरच्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजेपासून दारणा धरणातूनही अडीच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नंतर तो सायंकाळी ४ वाजता पाच हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. परंतु सायंकाळी पुन्हा तो ३९५० क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. हे पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने येत आहे. ते दोन दिवसांत जायकवाडीत दाखल होण्याची शक्यता असल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जायकवाडीत वरच्या भागातून केवळ ७२० क्युसेक्सने पाणी दाखल होत आहे. मात्र, आता दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढणार आहे. दोन दिवसांत ही आवक सुमारे अडीच हजार क्युसेक्सपर्यंत जाऊन जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, अशी आशाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. २० दलघमीची गरजजायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. या धरणाची मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. महिनाभरात जायकवाडीत २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.